दिवस: रविवार
वेळ: रात्रीचे १२.००
ठिकाण: घर .
पात्रे: बंडू , बंडूची बायको आणि बंडूचा १ वर्षाचा मुलगा - छोटू .
बंडू : आज गडबडच झाली ना . चायनिस खायला नाहीच मिळालं . परत नेहमीच्या इडल्या घ्यायला लागल्या .
बंडू ची बायको : गडबड काय त्यात . मज्जा आली . छोटू बीच वर काय खेळत होता ना . माझे तर पाय दुखायला लागले मागे पळून पळून . हा हा हा.
बंडू : पण भारी जेवायचं होतं ते राहून गेलं पुन्हा .
बंडू ची बायको : तुझी सटकलीये का ? मी बीच वरचा फोटो दाखवत्ये आणि तू काय जेवायचं बोलतोयस . भूक लागली आहे का . मस्त इडल्या तर चोपल्या कि मगाशी . . . झोप आता .
बंडू : ????
..............................................................................................................................................
वेळ: रात्रीचे ७.००
ठिकाण: चाईना टाऊन हॉटेल .
बंडू ची बायको : आपण परत जाउया. इथे खूप चांगला मेनू नहिये. आणि AC पण जास्त आहे. ग्लास काचेचे आहेत, छोटू फोडेल. खाली गुळगुळीत फारशी आहे, त्याला खेळता पण नाही येणार. आणि खूप वाजले आता . तो रडरड करेल.
बंडू : OK . पण जे आपण नेहमी घेतो ते सूप्स आहेत . बाहेर पण बसू शकतो. आणि लगेच मागवलं तर २० मिनिटात होईल जेवण . तसाही तो ९ वाजता झोपतो.
बंडू ची बायको : अं . . . . . . . नाही , नको . आपण जाऊ .
बंडू : चलो . इडली पार्सल घेऊन जाऊ .
..............................................................................................................................................
वेळ: दुपारचे ३.००
ठिकाण: घर .
बंडू ची बायको : ........... आणि आज फक्त सोय म्हणून नाही जेवायचं काय बाहेर … फुल कोर्स मस्त जेऊ . ५-६ महिने झाले कुठे गेलो नाही . लवकर जाऊ ७.३० ला म्हणजे निवांत बसता येईल .
बंडू : बेस्ट . चाईना टाऊन , पिझ्झा हट , किंवा तू सांगशील तिथे जाऊ .
बंडू ची बायको : आज चायनीस खाऊ ....... हुर्रे . . . झक्कास पैकी AC हॉटेलात , चांगल्या डीशेस मध्ये जेवण . येस . . . . !!!
..............................................................................................................................................
Lessons for all Dads....
- Whatever you heard in afternoon, is true for afternoon. Don't apply in evening.
- You want to treat your wife, treat your son.
- Your son's slightest real OR assumed discomfort ... You are in trouble.
- Your comfort safety factor : 1.5% (When 7.00pm is decided return time, till 7.30pm is late).
- Your kids's comfort safety factor: - 15% (When 7.00pm is decided return time, 5.30 is already late).
- When you head out hoping for full course dinner, please leave home after eating 1 Maggie, 2 pieces of cake, Glass of milk, & a bar of 5 star chocolate at HOME.
- Sit back & relax; No matter whatever happens with your weekend evening. You are neither a reason nor a cause. You just happen to be there.
- Most Important: For your wife, Your kid, his comfort, Schedule & happiness is everything. Nothing else matters !!!
Believe it or not, it is much more fun in letting your kid drive your day for a while than fulfilling your dreams, aspirations , wishes for the day. You may be missing many things & may wish to do lot many more, still it is more fun than NOT doing it just because you 'think' it might reduce comfort of your kid a little !!!