Friday, 14 April 2023

Aai Baba - Europe trip

वीणा वर्ल्ड बरोबर यूरोप ट्रिप चे बुकिंग झाले व सुरू झाली पॅकिंग ची गडबड , थंड हवेचे साठी कसले कसले स्वेटरर्स jerkin वगैरे , नवीन कपडे , बॅग्स ,अशी जमवाजमव झाली व निघालो मुंबई ते पॅरिस विमानाने , मध्ये झुरिच ला विमान बदलायचे होते , मध्ये फक्त दिड तास ,बापरे , कसे होणार एवढया लवकर immigragion वगैरे असे विचार येत होते व जात होते तेवढ्यात विमान सुटले सुद्धा , आता सगळी काळजी वीणा वर्ल्ड च्या टूर लीडर म्हणजे अतुल वर सोडून रिलॅक्स झालो.

आमचा विमान प्रवास उत्तम झाला , खाऊ व नाष्टा विमानात चांगला दिला , चॉकोलेट ही देत होते , चहा कॉफी होती , वेळेच्या फरकामुळे पहिला दिवस धावपळीत असतोच , tower बाहेरून व siene नदीत cruise सफर एवढे काल पाहिले , आज पॅरिस ची सिटी टूर दिवसभर आहे। व संध्याकाळी शॉपिंग. 

बाहेर थंडी आहे 4 डिग्री , पण वारा जास्त आहे ,हॉटेल व बस मध्ये temp maintain असल्याने  अजिबात थंडी नाही.

काल tower वर 2nd लेवल पर्यंत जाता आले होते, वरून सर्व गजबजलेल्या पॅरिस ला bye केले, नंतर पॅरिस ची सिटी टूर केली , संध्याकाळी 1 शो होता पण तो संपामुळे रद्द झाला , नशीब की पॅरिस मध्ये बाकी सर्व गोष्टी बुडल्या नाहीत , तेथे हल्ली संप चालू आहेत ना 

आज सकाळी ब्रुसेल्स , mhanje बेल्जियम कडे निघालो ,तेथे दुपारी automium पाहिले यानंतर ब्रुसेल्स मध्ये सेन्टर square  1, 2 पुतळे मोठें मोठे राजवाडे सदृश इमारती, churches , शॉपिंग ची ठिकाणे इत्यादी पाहून amster dam कडे निघालो

कालचा दिवस म्हणजे नाश्ता पॅरिस फ्रान्स मध्ये ,  जेवण बेल्जियम म्हणजे ब्रुसेल्स मध्ये व डिनर amsterdam म्हणजे netherlands मध्ये झाले 

आज 6 तारखेला सकाली 9 ला निघून Kokenhalf ला ट्युलिप गार्डन पहायची होती , आज हवा पावसाळी असल्याने थंड वारा खूप जास्त होता, पण मुख्य आकर्षण म्हणजे विविध रंगी ट्युलिप व इतर daffodils वगैरे पाहून डोळ्याचे पारणे फिटले , 

1857 सालची windmill तिथे आहे व त्यावरून भोवती चे फुलांच्या बागा अप्रतिम दिसतात,

आता दुपारी मॅक d मध्ये जेवण झाल्यावर कॅनॉल बोट ride ला निघालो

बोट छत वाली होती व बसायला उत्तम जागा होती , जात असताना आपण काय पाहत आहे ती commentry earphone ने ऐकायची ,  amstrrdam चा इतिहास व इमारतींचे महत्व व त्यांचा पण इतिहास ऐकत ऐकत ही सफर पूर्ण झाली , आज दिवसभर पाऊस आहे व ढगाळ वातावरण आहे त्यामुळे थंडी जास्त भासत आहे , आता जर्मनी मधील cologne या ठिकाणी मुक्काम आहे

6 april चा cologne येथील मुक्काम वैशिष्ट्य पूर्ण होता , एक बाजूला rhyne नदीचे पात्र , त्यातून होणारी माल वाहतूक ची मोठी जहाजे , व काठावर अप्रतिम हॉटेल  असं होते , तन्मय तिकडे जवळ राहतो व त्याला आधी कळावल्यामुळे त्याने आमची भेट त्याच हॉटेल मध्ये बुकिंग करून ठरवली, त्यामुळे दुधात साखर , योग आला , त्याच्या गाडीतून छोटी rid e व गप्पा झाल्या, फार आनंद झाला , तेथून सकाळी निघालो ते स्वित्झर्लंड गाठण्यासाठी च

दुपारी 4 च्या सुमारास cuckoo क्लॉक फॅक्टरी व विक्री होती,  4 वाजता बरोब्बर त्या घड्याळातून dancing dolls च्या जोड्या बाहेर येऊन जातात , फार मस्त show होता , हा दर तासाला असतो अप्रतिम घड्याळे व तत्सम वस्तू होत्या

त्यानंतर rhyne वॉटर fall व बोटींग साठी निघालो

हे बोटींग फारच exciting होते , धबधब्याच्या अगदी जवळ जाऊन थोडे पाणी उडNयाचा आनंद घेता येतो, आल्यावर अशक्य असा वडापाव व चहा मिळाला जो युरोपात दुर्मिळच आहे ,

आजचे 8 एप्रिल चे हॉटेल उत्तमच आहे , ब्रेकफास्ट नेहमी प्रमाणे ब्रेड व इतर ,यानंतर निघालो ते उत्कंठा वाढवणारे ठिकाण म्हणजे mount titlis, snow point, 

तेथे 2 प्रकारच्या गोंडोला तुन प्रवास आहे , हळू हळू वर बर्फात गेलो म्हणजे glaciers वरच हॉटेल पण तिथेच व glacier cave ,आणि स्काय walk पण बर्फातून च, खु,,प मस्त धमाल आली





Technology व इन्फ्रास्ट्रक्चर चा उत्तम प्रकारे वापर गेले कित्येक वर्षे चालू आहे , त्यांची कमाल आहे

दुपारनंतर lucern lake मध्ये बोट ride व shopping झाले

आज 9 एप्रिल सकाळी 9 वाजता स्विस हॉटेल ला बाय केले व vaduj म्हणजे linchestine या छोटया देशात जाण्यासाठी निघालो, 36000 वस्ती आहे केवळ , rhine च्या काठावरची वस्ती केवळ बघण्यासारखी लाजवाब होती  , डोंगरावर 1 castle ,तिथे अजूनही राजघराणी राहतात , व गावातील सर्व wineyards मधील wine तेच फस्त करतात,  

ट्राम ride होती गावातून , व्यवस्था सुरेख आहे सर्व माहिती ऐकत ऐकत फेरफटका झाला व नंतर जेवण

आता ऑस्ट्रिया तील insbruke या ठिकाणी जाण्यास निघालो. हा प्रवास वैशिष्ट्य पूर्ण आहे तो वाटेतील मोठ्या मोठ्या tunnel साठी , 10 km 13 km 6 km असे बोगदे सतत आहेत व बाहेर पडले की बर्फाच्छादित शिखर व खाली नितांत सुंदर अशी गावे दिसतात

इथे इंन्स रिव्हर आहे, क्रिस्टल museum, Sworovasky Museum खूपच आवडले.

चमचमत लखलखीत हिरे की खडे काय ते वैभव !!

ऑस्ट्रिया खरच सुंदर वाटला, 10 april, आज निघालो ट्रिप मधील शेवटच्या देशात , इटली ला, इंन्सब्रूके वरून padova इटली मधील साधारण पणे 600 km चा प्रवास होता, सुंदर प्रदेश आणि इटालियन आल्प्स.


मध्ये आलो ऑस्ट्रेलियन आल्प्स मधून सर्व प्रवास  डोंगरातून पण वाटलेच नाही इतका रम्य . युरोपा ब्रिज हा 52 km चा बनवलाय, अनेक बोगदे काढून डोंगर पूर्ण न फोडता केलाय कॅन्टीलिव्हर करून खालून pillar टाकून केलाय . नंतर padova हुन व्हेनिस ला vaporator water बस ने आलो तेयहील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तू पाहून गोंडोला ride करून icecream मटकवले व bologna येथे मुक्कामाला आलो.

11 एप्रिल ला पिसा येथे पिसाचा मनोरा पाहण्यासाठी निघालो. पिसाचा मनोरा 600 इसवीसनाच्या आसपास बांधला गेलाय तो 1 बेल tower आहे ,कॅथेड्रल च्या समोर , तेही खरे तर भव्यदिव्य आहे व unesco ची हेरिटेज site आहे , फार छान वाटले हे ठिकाण , तेथे pizza ,pasta व पिठले भात सुद्धा असे मजेशीर जेवण घेऊन rome ला जाण्यासाठी निघालो

11 april ला दुपारी रोम येथे जाण्यासाठी निघालो , वाटेत एक मॉल होता तिथे शॉपिंग साठी थांबलो, विविध प्रकारच्या कार्स , चॉकलेट स biscuits अशा अनेक गोष्टी होत्या , आवडेल त्यांनी मनसोक्तपणे खरेदी केली व पुढे निघालो, रोम येथे संध्याकाळी पोचणार होतो व रात्रीची walking टूर होती 

चालत चालत तिथल्या प्रसिद्ध वस्तू ज्या खूपच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या आहेत त्या पहिल्या , त्याम्ह्णणजे trivian fountain,  collossium, व राजवाडा पहिला , सोबत असलेल्या guide मावशीची कमाल वाटली, वय 77 व तुरु तुरु चालत त्या ड्युटी म्हणजे नोकरी करत होत्या , त्यांच्याकडे पाहून आपण कंटाळलेले पण आम्ही घालवले व रोम सिटी टूर चा आनंद घेतला 

आशा तर्हेने शेवटच्या दिवशी रात्री 12 ला परत हॉटेल वर आलो अवरावरी करून 6 च्या परतीच्या प्रवाससाठी  रवाना झालो,

अशा यूरोप टूर चे वैशिष्ट्य जाणवले ते  म्हणजे रस्ते, गाड्या व ट्रॅफिक यांची उत्तम व्यवस्था, सिग्नल स्वतः हुन सगळीकडे पाळतात , व कडक असे driving चे नियम यामुळे रोड जर्नी उत्तमच होते ,असो याबरोबर च सर्वांचा निरोप घेऊन आपल्या देशात परतलोय.







Monday, 3 April 2023

Looking inside

Outside the window, the station disappeared !

The village ended, and farms appeared !

The train now was fast !

More than few seconds, nothing outside would last !

Tunnel and bridge looks beautiful in speed !

Looking elsewhere wasn't the need !


Suddenly someone tapped on the shoulder !

His hands were firm and colder !

He pointed at a small boy !

He was playing with a toy !

I kept looking and forgot about the bridge !

Though it was beautiful, far was the ridge !

The farm was greener but moving away from me !

The toy was simple but was coming along with me !

At the destination, i remembered beautiful terrain I saw in a glance !

And The Boy with whom my mind still dance !


... Harshad.