Tuesday, 7 January 2014

नवे जुने


बघता बघता जुने पांगले
कुणी वारीवर कुणी स्वारीवर 

पुन्हा पुन्हा जरी ठरवत होतो
नाही भेटलो कधी टपरीवर 

नवे मिळाले सूर जुळाले
जुळवत गेलो कधी वाटेवर ……. 

नवे लांबले जुने जाहले
पुन्हा नव्याने नवे भेटले 

जरी भेटतो नव्या दमाने
स्मरते जुने जुन्याचे जुने 

कधी वाटते चक्र थांबुनी
नवे चिरंतन नवे रहावे 

कधी चक्र हे उलटे फिरुनी
सर्व जुन्याचे नवे करावे

.....हर्षद 

No comments:

Post a Comment