उतरला मांडव
आनंदाचा, प्रेमाचा
याच ठिकाणी पूर्व पश्चिम
उजवा हात, दावा पाट
आशीर्वादाचा, देवाचा
लगबग गलबल नमस्कार
शास्त्रोक्त सारे सोपस्कार
क्षणाचा, मुहूर्ताचा
आपली माणसं, घट्ट विणलेली
आली, बसली, हसली गेली
मानाची, हट्टाची
संपले तांडव
उतरला मांडव
आनंदाचा, प्रेमाचा
कोपऱ्यात थकलेले दोन डोळे
शांत, कृतार्थ डबडबलेले
मदतीचे, कष्टाचे
अक्षांश, रेखांश ग्रह, वेळ
वेगळी व्यक्ती, तोच खेळ
बघण्याचा, दाखवण्याचा
चढला मांडव,
सुरू तांडव
आनंदाचा, प्रेमाचा !
No comments:
Post a Comment