Sunday, 25 September 2016

परफेक्ट !!!

केसांचा थोडा भांग  विस्कटू दे , चश्म्यावर थोडी धूळ असू दे 
पळताना बुटाची नाडी सुटू दे , डावीकडून इन शर्ट बाहेर येऊ दे , काही बिघडत नाही !

भाजीत जास्त मीठ पडू दे , बघून आणलेला नारळ कुजू दे ,
उठायला थोडा उशीर होऊ दे , नाटकाला थोडी डुलकी लागू दे , काही बिघडत नाही !

बोलताना मित्राचं नाव विसरू दे , बायकोनं सांगितलेलं काम राहू दे ,
गाडीतलं कधी पेट्रोल संपू दे , मोबाईल फोन जरा बंद पडू दे , काही बिघडत नाही !

लिहिताना पेनाची शाई संपू दे , चित्रातला रंग थोडा बाहेर जाऊ दे 
वहीचं एखादं पान फाटू दे , गाताना एखादी तान चुकू दे , काही बिघडत नाही !

काय वाट्टेल ते होऊ दे पण  आपल्याच  चुकण्यावर, फसण्यावर  हसायची ताकद असू दे , 
मग . . . . . . . . . . . . . . . . . खरंच काहीच बिघडतच नाही !!!




............................................................................. हर्षद 

No comments:

Post a Comment