काही सूर्यास्त अपूर्णच राहणार !
क्षितिजाच्या पसाभर वर, धुक्याच्या आभासी किनाऱ्यात,
काही सूर्यास्त भाळीच्या भारदस्त कुंकवासारखे दिसले
आणि क्षणा क्षणाला क्षीण होऊन, त्याच क्षणात भव्यतेची साक्ष देऊन देखील,
मनस्वितेच्या लाटांवर आरूढ झालेल्या कलाकृतिसारखे अपूर्णच राहणार !
सूर्यास्ताच्या प्रक्रियेत सामावलेले पूर्णत्व, अनुभवातून अपूर्णते वर मात करणार की
राहिलेली रुखरुख मध्यानीच्या तेजाला विस्मृतीत ढकलणार?
यावर भविष्यातील भूतकाळाचे प्रतिबिंब अवलंबून आहे !
No comments:
Post a Comment