Sunday, 16 June 2024


नदीच्या किनाऱ्यावरील एक चाफ्याच झाड पलीकडच्या काठावरच्या बकुळीला म्हणलं, 
"इथून सूर्यास्त काय सुंदर दिसतोय.. तुला येता आलं असतं तर बरं झालं असतं "! 
बकुळी म्हणते, "इथून पण्यातल तुझं प्रतिबिंब पाहतेय मी. ते नसेल तिथे येऊन तर मी इथेच बरी आहे !" 




तुझ्यासारखाच दिसतोस तू पण तुझ्या आतला नाहीस तू 
चेहरा जरी हसरा तरी डोळयात आनंदी नाहीस तू 

कोण सोडवणार तुला कैदेतून तुझ्याच 
जाणतोस दुःख तूझ्या आतले फक्त तू 

का संपल्या आशा तूझ्या आतल्या 
का कोंडलेस छंद पिंजऱ्यात तू 

 रात्रीच्या प्रकाशातले सारे स्वप्न तुझे 
दिवसाच्या अंधारात हरवलेस तू

No comments:

Post a Comment