Tuesday, 23 April 2013

इथे सगळी डुकर राह्तात !

मुलांनो, लोकशाहीची व्याख्या सांगा पाहु… 

डुकरांनी , डुकरांचे , डुकरानसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही !

आमचे राष्ट्रपती (राष्ट्र डुक्कर व त्यांचे सहकारी ) हे मारायला आलेलं , ४ शब्द बोलताना धाप लागणारं , कशाचहि सोयर सुतक नसलेलं एक चिखल डुक्कर आहे… (म्हणजे त्यातल्या त्यात स्वच्छ). नुकतंच एका गु - डुकरांच्या कळपातून त्याला वेगळं काढलंय . त्या कळपात मुकी, बधीर, मूर्ख, दांगट , वासाडी अशी ५५० डुकर आहेत. ती एका गोल डबक्यात बसण्यासाठी आम्हा डुकरांनी निवडून दिलित. ते डबकं जाकीट वाल्या वस्ताद डूकरानी एकमेकांचा गु खायच्या सोयीसाठी वापरायला काढलं ते अजून उपयोगी आहे. 

इथे काही माणसं पण आहेत. पण ती खूपच कमी आहेत आणि रोज कमी होतयत. त्यामुळे हि डुकर त्यांचं ऐकतच नाहित. ती माणसं गोल डबक्याजवळ बसून २ - ३ दिवस "बलात्कार, अब्रू,शिक्षा" असा काहीतरी बोलतायत , पण आम्हाला कुठे कळतंय . डुकरा मध्ये असा काहीच नसतं न !

ते म्हणतात, "कडक शिक्षा करा म्हणजे अस होणार नाही पुन्हा" . तर हि गु डूकर म्हणाली " मग तुम्ही नीट  कपडे घाला ." आता माणसांनी (बायकांनी) लोखंडाची कुलूप किल्ली असलेली चिलखत घालून फिरायची का काय ??? असो. माणसांचे विषय वेगळे , डूकरांचे प्रोब्लेम वेगळे . माणसांना अब्रूची पडलीये , इथे चांगला गु मिळत नाही त्याचं ह्यांना काहीच नाही . 

खर म्हणजे माणसं कमी होतायत कारण लोकशाहीचे कडक नियम ! माणसांचा डुक्कर होणं एकदम सोप्पा आहे , पण डुक्कर पुन्हा माणूस होऊ शकत नाही . सगळी डुकर माणसाला उपाशी ठेवतात , आणि कागदी नोटा , नाणी , जमिनी , दारू , लाच ह्यात बांधून एका स्त्री डुक्करच्या हाती हिरवा गु खायला देतात. मग तो चुकून , मुद्दाम , नाइलाजानि कसाही खाल्ला तरी त्या माणसाचं डुक्कर होतं . मग काय , सगळच सोप्पा ! डुक्कर शाही मध्ये काही नियम एकदम कडक आहेत. डुकरांनी एकमेकाला त्रास द्यायचा नाहि. सर्व गु वाटून खायचा गु , चिखल , गटार , नाला , घाण , असा जातिभेद करायचा नाही . जास्तीत जास्त माणसांना  डुक्कर करायचं , कारण जेवढी जास्त डुकर , तेवढी लोकशाही यशस्वी !

खूप लांब , पश्चिमेला एक महा डुक्कर आहे , तो गु फुकट वाटतो , म्हणून त्याला सगळे रेपोर्ट कर्तात. पुढच्या १०  वर्षात तशीच महासत्ता ( सॉरी , महाडूक्कर ) बनायचं असा निर्धार केलाय त्यांनी . म्हणजे मग बलात्कार , स्त्री , प्रतिष्ठा , संस्कृती असले बोगस लेक्चर ऐकण्यात वेळ जाणार नाही . तिकडे असा काही नसताच ! म्हणजे तिथे असतं पण त्यांना आपल्याकडे तसला तसलं नको आहे . 

स्त्री , पुरुष , बायका , मुलं , आई , वडील , भाऊ , बहीण , मित्र , शेजारी , शिक्षक , गुरु , पाहुणा , अनोळखी असे हीन कुलीन विचार न करता सर्व डुकरांना एकत्र मजा मारता आली पायजे हेच उद्दिष्ट आहे गोल डबक्याच . आधी वाटलं त्यापेक्षा फारच हे शक्य होईल . आम्ही प्रयत्नच करत आहोत तेवढे . बघाच तुम्ही , फार लांब नाही , हे असाच चालू राहू शकलं , तर पुढचीच पिढी जातिवंत संस्कृतीहीन डूकार तयार होतील . सगळे एकमेकांचा गु खाण्यात मग्न ( नग्न) होतील आणि लोकशाही सार्थ होईल . 

डुकरांनी , डुकरांचे , डुकरान साठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही !

No comments:

Post a Comment