Monday, 13 October 2025

ब्रह्मांड

 मनाच्या रानी फुलले ब्रह्मांड

गाभाऱ्यात एक सदाफुली


आत शोधता विश्व सापडे

रानात गवसली स्वत्वाची खोली


गाभारा मंडप एक झाले

कसले वाळवंट, कसल्या वेली


जागेपणी जिचे स्वप्न दिसले

स्वप्नातले सत्य बनून राहिली


सुंदरतेचे गुपित सुंदर राहिले

गुपिताची सुंदरता गुप्त राहिली