Thursday, 5 November 2026

 खूप जुना, लहान पणीचा बडबड्या मित्र अचानक भेटला,

घडलेलं, न घडलेलं, वरवरचं सांगण्याची नारळाच्या सालीसारखी 

जाड शाल घट्ट ओढून, इकडचं तिकडचं खूप बोलला.


थोडा ऐकलं, थोडं पाहिलं, मग त्याच्या पाठीवर एक थाप मारून, 

दोन शब्दाच्या मधल्या इवल्याश्या मौनात तो नारळ सोलायला घेतला.


सुखदुःखाच्या घटनांच्या नारळाच्या काथ्या हात हातात घेऊन ओरबाडून टाकल्या.

मुलांची शिक्षणं, नोकरीतल्या गमती यासारख्या कडक करवंत्या एका नजरेत फोडल्या.


जमलेल्या यशाच खोबरं आणि न जमलेल्या गणिताची वाटी "बाकी कसायस?" या एका प्रश्नाने खरवडली.


एवढे कष्ट केल्यावर, मग कुठे चार थेंब गोड पाणी हाताला लागलं....

.........या सगळ्या जगरहाटीत त्याने केलेल्या कविता, काढलेली चित्र अन् बघितलेल्या जागांचं !!!!!

sangrah

1. 

बघू तिकडे विरोधाभास

आरसा सांगे मलाच, मनातली आस


माझी बाजू डावी, तीच तुझी आहे उजवी 

तरी माझं मत काचकड्याचं, तुझं म्हणणं वाजवी 


देवाशप्पथ खरं सांगतो, मी देवाला मानत नाही

अशी आहे प्रचलित म्हण, कुणाला वावगी वाटत नाही 


बाबांनी शिकवलं, किती वाजले व्यवस्थित सांग

सांगे तो वेळ बदलत होती, काटे बघत लागेना थांग 


इतिहास गणितं सगळ्या सकट, होता की हो भ्रम 

मिठी मारायच्या विचारात ह्या क्षणाला मनसोक्त रम


2.

सकाळी मोर नाचून गेला,

स्वर्गीय नर्तक उडाला 

दुपारी कडाडून वीजा झाल्या 

जंगलभर वारा सुटला


लक्षात राहील, मनात ठसेल 

असं बरंच काही घडलं 


पण कोरला गेला तो मात्र

..... गुणगुणणारा पक्षी !


3.

वाटली सदाफुली जी

तेच ते ब्रह्मांड होते

मिळून जाई गुच्छ अवचित

पाकळी तरी कवटाळू पाहे 


का मिळाली नाही आधी

का न मिळते पुन्ह पुन्हा 

हेच पुसतो अन् गमवतो

जे मिळाले स्वर्ग होते


भरवुनी डोक्यात मुंग्या

भावनिक वारूळ रे 

झटकुनी ही जळमटे तू

जादू हातातूनि झरे


4.

राधा कृष्ण, राम सीता, शंकर पार्वती, लक्ष्मी नारायण, सरस्वती नदी

मनाच्या रानी फुलले ब्रह्मांड

गाभाऱ्यात एक सदाफुली 

आत शोधता विश्व सापडे

रानात गवसली स्वत्वाची खोली

गाभारा मंडप एक झाले

कसले वाळवंट, कसल्या वेली

जागेपणी जिचे स्वप्न दिसले

स्वप्नातले सत्य बनून राहिली

सुंदरतेचे गुपित सुंदर राहिले

गुपिताची सुंदरता गुप्त राहिली

 होने दो जो हुआ

जाने दो जो गया 

फ़िज़ूल है मतलब निकालना

हौद से भी जाएगा, बूंद से तो गया


गया मतलब आया था

शुक्र है मै भी मौजूद था

अनंतकाल ऐसे गुजरा था

कभी बूंद न थी, कभी हौद न था,

हकीकत

 वादे सुने थे साथ निभाने के बहुत,

अभी हकीकत आजमाये देवलोक आया हूं 


"मेरे बगैर अधूरी जिंदगी" केहकर,

इस दूर समशान से, 

मुझे दफनाकर लौटकर 

घर जाने वाले

शाम की सब्ज़ी, मोमबत्ती 

और ताश की गड्डी खरीदते देख आया हुं!

सोनं

 दिलेलं... परत आलं 

आलेलं... परत गेलं 

मोजलेलं... वाया गेलं 

विसरलेलं... अमाप झालं

आधीचं... तिथेच राहिलं 

नंतरचं... जास्त झालं 


.......................आत्ताचं.... सोनं आहे!

हिशेब

 कालची अलगद मिठी..... 

वहीत लिहून ठेव !

परवाची चोरटी नजरानजर..... 

हिशेबात मांडून ठेव !

घराखालून मारलेली हाक..... 

हातचा धरून ठेव !


न मिटलेलं पान, न सुटलेलं कोडं 

न झालेली भेट, न जुळलेलं नातं 

.......... सारा हिशेब चुकता !!!!!

Delete

 I just messaged Vishnu to ask: "Delete Human, race not worth"

Message bounced back. Says: "Address not found. Deleted by Human"