Wednesday, 17 September 2025

गरज

 गरजच नसते !


जेव्हा तुमच्या प्रत्येक शब्द शिरसावंद्य मानून सगळी माणसं प्रेमळ भावनेने,

क्षणाचाही विलंब न लावता, तुम्हाला हवं तसं करत असतील,


तुम्हाला हवे त्यापेक्षा चार पैसे जास्त देऊन साहेब "अजून काही लागलं तर सांगा बरं हक्कानी" असा बजावून सांगत असेल,


बायको वेळच्या वेळी स्वयंपाक करून, मुलं सगळा अभ्यास संपवून, गडी लोक सांगितलेलं काम संपवून तुमची आनंदातिरेकानी घरी रोज वाट पहात असतील,


आणि तुमचा इन्व्हेस्टर "खूप पैसे साठवलेस बाबा, आता ४ वर्ष थोबाड बघू नकोस माझं" असं ठणकावून सांगत असेल,


तर काही सांगण्या-ऐकण्यासाठी, 

पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी,

एका सहज शेकहॅण्ड मधे आश्वासन देण्यासाठी, 

डोळ्यातून आत उतरून शब्द आणि मन यातली दरी जोडणारा पूल बांधण्यासाठी,


कोणाची, अगदी कोणाचीही गरज नसते ! 

जिवलग मित्राची तर छे.. अजिबातच नसते !

 मौनाला फुटली भाषा,

अन् स्पर्ष बोलका झाला !

नजरेत साठला काळ,

श्वासास विश्व तो जाळ !


आकाश धरित्री भेट,

चक्रवाक वाकी थेट !

रात्रीत तृणांना  जाग,

राखेत लपविली आग !

leap of faith

 A leap of faith !!!


In this super calculated, risk free

Protected, supervised, monitored

Fixed, definite and proven path 

of limited success,


Where every movement is pre-planned

Every scenario is well thought 

Every word is carefully woven, when you reach the 

End of the path, where you win !


Nothing is lost.......


Except the leap of faith.......


Which you never took !

पांढरा रंग

 पांढरा धागा


आडनाव, वळण, प्रतिष्ठा, शहर

शिक्षण, संकल्पना, प्रतिष्ठा, विचार,

काहीच जुळेना, 

तरी ओढले जातो एका चुंबकाकडे.


जणू बांधले आहोत घट्ट पांढऱ्या धाग्याने, 

नक्की माहित नाही, अंदाज आहे नुसता.


.....स्वच्छ सूर्य प्रकाशात पारदर्शक पांढरा रंग दिसत नाही.

तुम्ही सुटलात !

 कोण अडकलं, कोण सुटलं!


मी आलो की माझ्यासोबत गप्पा मारणार होतात

मी आलो, की मला तक्रार करणार होतात

मी आलो, की माझ्यावर रागावणार होतात

मी आलो, की माझ्यासोबत भांडणार होतात


मी आलो नाही म्हणून रुसलात, आणि 


मित्रांशी गप्पा मारल्यात 

वडिलांकडे तक्रार केलीत 

मुलावर रागावलात 

बायकोसोबत भांडलात 

आईवर रुसलात 


तुम्ही सुटलात !


पण मी आलो की मी हेच सगळं तुमच्यासोबत करायचं ठरवलं होतं ना,


मी अडकलो !

मूर्खपणा !

 नाजूक तरल भावनेच्या उत्कट पणाची भीती वाटून 

हळुवार आंदोलनाशी केलेल्या अनामिक ओढीच्या 

आणि विवेकबुद्धीच्या अनाकलनीय परस्परांशी 

केलेल्या घनघोर संघर्षाला आणि त्यातून.....

स्मितहास्यापासून चार हात लांब अन् 

अनवट नैसर्गिक लाघवातून तटस्थ 

राहायच्या क्षीण प्रयत्नाला

काय म्हणतात ?


मूर्खपणा!

बेहने दे

किसके पीछे भाग रहे हैं

कौन हमारे पीछे है ?


कहां से लेकर कहां कहां तक

डर, समझोता ही खीचे है 

प्यार किसे है मिलता कौन

सब अहंकार के नीचे है


क्यों छूटे ऑर कैसे निकले 

भवर की धारा गेहरी है

बेहने दे मुझे बहने दे

सागर से जा मिलना है

मित्र

 खूप जुना, लहान पणीचा बडबड्या मित्र अचानक भेटला,

घडलेलं, न घडलेलं, वरवरचं सांगण्याची नारळाच्या सालीसारखी 

जाड शाल घट्ट ओढून, इकडचं तिकडचं खूप बोलला.


थोडा ऐकलं, थोडं पाहिलं, मग त्याच्या पाठीवर एक थाप मारून, 

दोन शब्दाच्या मधल्या इवल्याश्या मौनात तो नारळ सोलायला घेतला.


सुखदुःखाच्या घटनांच्या नारळाच्या काथ्या हात हातात घेऊन ओरबाडून टाकल्या.

मुलांची शिक्षणं, नोकरीतल्या गमती यासारख्या कडक करवंत्या एका नजरेत फोडल्या.


जमलेल्या यशाच खोबरं आणि न जमलेल्या गणिताची वाटी "बाकी कसायस?" या एका प्रश्नाने खरवडली.


एवढे कष्ट केल्यावर, मग कुठे चार थेंब गोड पाणी हाताला लागलं....

.........या सगळ्यात त्याने केलेल्या कविता, काढलेली चित्र अन्.... एकट्याने केलेल्या जागरणाचं  !!!!!

3


1

पानी की सुगंध

हवा का एहसास

आग की घुमास 

आसमा की मिज़ाज 

हूं मै 


भगवान, देव, त्राता नहीं

तो फिर कौन 

हूं मै!


2


धुआं धुआं महल हुआ 

माटी माटी नाम हुआ 

धुआं ही था, माटी ही थी

भगवान की ये कहानी थी


इन्सान तो बस लिखता था



3

बहका में, उलझा मै 

चिल्लाया, सताया मै

किस भाषा में, लब्ज़ में

बताऊं, समझाऊं मै 

अकेला छोड़ दो,

खूब शांत हूं मै