गरजच नसते !
जेव्हा तुमच्या प्रत्येक शब्द शिरसावंद्य मानून सगळी माणसं प्रेमळ भावनेने,
क्षणाचाही विलंब न लावता, तुम्हाला हवं तसं करत असतील,
तुम्हाला हवे त्यापेक्षा चार पैसे जास्त देऊन साहेब "अजून काही लागलं तर सांगा बरं हक्कानी" असा बजावून सांगत असेल,
बायको वेळच्या वेळी स्वयंपाक करून, मुलं सगळा अभ्यास संपवून, गडी लोक सांगितलेलं काम संपवून तुमची आनंदातिरेकानी घरी रोज वाट पहात असतील,
आणि तुमचा इन्व्हेस्टर "खूप पैसे साठवलेस बाबा, आता ४ वर्ष थोबाड बघू नकोस माझं" असं ठणकावून सांगत असेल,
तर यातलं काही काही सांगण्या-ऐकण्यासाठी,
पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी,
एका सहज शेकहॅण्ड मधे आश्वासन देण्यासाठी,
डोळ्यातून आत उतरून शब्द आणि मन यातली दरी जोडणारा पूल बांधण्यासाठी,
कोणाची, अगदी कोणाचीही गरज नसते !
जिवलग मित्राची तर छे.. अजिबातच नसते !
No comments:
Post a Comment