खूप जुना, लहान पणीचा बडबड्या मित्र अचानक भेटला,
घडलेलं, न घडलेलं, वरवरचं सांगण्याची नारळाच्या सालीसारखी
जाड शाल घट्ट ओढून, इकडचं तिकडचं खूप बोलला.
थोडा ऐकलं, थोडं पाहिलं, मग त्याच्या पाठीवर एक थाप मारून,
दोन शब्दाच्या मधल्या इवल्याश्या मौनात तो नारळ सोलायला घेतला.
सुखदुःखाच्या घटनांच्या नारळाच्या काथ्या हात हातात घेऊन ओरबाडून टाकल्या.
मुलांची शिक्षणं, नोकरीतल्या गमती यासारख्या कडक करवंत्या एका नजरेत फोडल्या.
जमलेल्या यशाच खोबरं आणि न जमलेल्या गणिताची वाटी "बाकी कसायस?" या एका प्रश्नाने खरवडली.
एवढे कष्ट केल्यावर, मग कुठे चार थेंब गोड पाणी हाताला लागलं....
.........या सगळ्यात त्याने केलेल्या कविता, काढलेली चित्र अन्.... एकट्याने केलेल्या जागरणाचं !!!!!
No comments:
Post a Comment