Wednesday, 20 February 2013

मला भेटला एक वेडा..एक कविता...!!!

मला भेटला एक वेडा

इयत्ता ९ वी तुकडी क मध्ये बसायचा
दर सोमवारी रडायच्या तासाला
बुट्टी मारून फिरायला रानात जायचा

मुला म्हणायची , बुडला कि रे तास तुझा
आता बस रडत ! पण हा कशाला रडतोय
रडाय्चाच तास ना बुडवला

पुढं आयुष्यात रडायचे खूप प्रसंग आले
पण हा कधीच नाही रडला
शाळेत शिकवला तेव्हा गेला होता ना नदीत पोहायला

बाकीची हुशार मुलं neet रडायला शिकली
शाळेत तर झालीच पुढं ही खूप वेळा प्रक्टिस झाली
पण म्हातारपणी वेड्याचे पेपरातले फोटो आणि सत्कार बघून त्यातलाच एक जण म्हणाला

.....बहुतेक आपण सुद्धा सोमवारचा तास बुडवायला हवा होता !

No comments:

Post a Comment