नादकासमोर मी वाजवलेला चारुकेशी...!!!
आम्ही फोन केला, म्हणलं येऊ का?
तो म्हणला "ये, जरा गम्मत करू.."
गेलो .
तो म्हणला , "चहा घेणार?" म्हणलं "नको".
पण त्यांनी दिलाच. मग काय?
घेतला.
आम्ही विचारलं , "कसे आहात?" तो म्हणला , "बराय कि, संतूर आणलय? बसुयात?"
म्हणलं "हो".
बसलो.
त्यांनी गिटार काढली आणि म्हणला , "आम्ही बुआ ख्रिस्चन , पण गायत्री मंत्र म्हणतो रोज, म्हणूयात का?"
म्हणलं "हो".
म्हणलो.
गिटार कसली, वीणा वाजत होती...राग हेमावती,
तो म्हणला, "वाजवू का?"
म्हणलं "हो, मी गातो थोडासा".
गायला.
मग काय, सुरूच झाला तो,
म्हनला, "हे ऐक, ते ऐक,
हे कसय , ते कसय ?
हे कसं वाजवलं ? आवडल?"
आता काय सांगणार?, कपाळ?
रामाच्या देवळात जावं , नमस्कार करावा,
आपण म्हणाव, "अस्य श्री रामरक्षा स्तोत्रम..."
तेवढ्यात रामानी म्हणावं , "ऐक, मनोजवं मारुत तुल्य वेगम......इति श्री रामरक्षा स्तोत्रम...,
बरी म्हणली का रामरक्षा??
आता काय सांगणार?, कपाळ?
मग तो म्हणला, "काय वाजवतोस?"
मी म्हणलं , "काही नाही, हे आपल, असाच, सहज..
चारुकेशी वाजवावासा वाटतोय, वाजवू?"
तो म्हनला, "वजाव कि, मी पण वाजवतो सोबत."
मग काय?
वाजवला.
त्यांनी गायत्री मंत्र म्हणला , शांताकारं म्हनला,
शिवस्तोत्र म्हणलं ,
मला वाटला त्याचं नाव घैसास नायतर अभ्यंकर आहे,
नव्हतं .
नादका च होतं .
मग तो म्हणला , "जेवणार का? मी स्वयपाक केलाय."
मी म्हनला, "राहूदे कशाला? "
तो म्हणला, " नाही नाही, जेवाच."
मग काय,
जेवलो.
पुढचा आठवत नाही.
हे पण आठवत नव्हताच.
घरी आल्यावर मर्ढेकरांना विचारला,
त्यांनी सांगितल.
No comments:
Post a Comment