Wednesday, 20 February 2013

तुम्हाला कोण व्हायचं ???



तुम्हाला कोण व्हायचं ? तामिळीयन  , युरोपियन कि ओरोविलिअन?

खर म्हणजे जगात प्रत्येक देशाच नागरिकत्व मिळवून तुम्ही त्या देशाचे होऊ शकता. पण ज्याच्या पुढे 'कर' जोडावे किंवा टेकावे अश्या ह्या ३ जाती जगात आहेत.तुम्ही कुठूनही आलेले असाल, तुम्ही तामिळी कधी होऊच शकत नाही. त्यासाठी तुम्हाला चेन्नैत तिसरी पिढी म्हणूनच जन्माला याव लागत. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुम्ही श्रीलंकन, ब्राझीलिअन , आफ्रिकन, बिहारी, डोगरी अगदी पुणेरी असाल, तरी तुम्हाला तामिळी व्हायची झालेली इच्छा तमिळनाडूत आल्या आल्याच मरून जाइल. कारण ह्याच्या इतका गलिच्छ आणि अस्वच्छ कोणताच प्रदेश नसावा. (अमेरिका आणि लवासा सोडून)... पण तुम्ही इथे यायच ठरवलत कि मग कपडे, भाषा, जेवण ह्या बाबतीत तुम्हाला तमिळ व्हावच लागत.  लोक इतर कोणतीच भाषा बोलत नाहीत म्हणून, भाताशिवाय काहीच खात नाहीत आणि पिकवत नाहीत म्हणून, आणि उकाडा 'लुंगी शिवाय काहीच सोयीचा नाही' असा सांगतो म्हणून...!!!

तुम्हाला युरोपिअन व्हायचं का...सोप्पा आहे. एकच गोष्ट...कशालाही लाजायच नाही !!! म्हणजे हा नियम कष्टाची काम करणे स्वतःचे कपडे स्वतः धुणे, बाग स्वतःच स्वच्छ करणे, गाडी स्वतः रेपैर करणे, कपडे न घालता फिरणे, एका पेक्षा जास्त बायका आणि ५ पेक्षा जास्त (अनौरस ) मुल असणे, आपल्या बायकोच्या दुसर्या नवर्याची बायकोने स्वतःच ओळख करून दिल्यावर त्याला स्वताच्या तिसर्या बायकोची ओळख करून देणे आणि "हिच्यापासून लांब रहा' अस हसत हसत बजावणे, रस्त्यावर बसून खाणे, ५ स्टार हॉटेलात अर्धी चड्डी घालून मीटिंग ला जाणे, ह्या सगळ्याला लागू होतो. म्हणजे थोडक्यात 'स्वावलंबन आणि स्वैराचार ' ह्याचा सुरेख  (?) संगम असणे म्हणजे युरोपिअन होणे...!!!

तुम्हाला ओरोविलिअन व्हायचं का...जरूर व्हा..नक्की व्हा. पण मुख्य सल्ला असा..कि पुन्हा विचार करा...!!!  पण एकदा ठरलाच, कि मग यासारख दुसरं सुख नाही....!!! बेरोजगारीचा फोर्म  भरून सरकारकडून महागाई भत्ता घेणे, आणि ओरोविलिअन व्हायचा फोर्म  भरून मेंटेनन्स घेणे ह्यात एक कमालीच साम्य आहे. ओरोविलिअन होताना पोटा पाण्यासाठी तुम्ही काही करत असाल तर उत्तम...(ओरोविलिअन फाउंडेशन साठी)...पण जर २ वेळचे खाण्याचे वांदे असतील आणि हात पाय हलवायची इच्छा नसेल तर मात्र अति उत्तम...(स्वतःसाठी)... ह्यासाठी महत्वाचा नियम म्हणजे 'नादारी, आळस , योगासनाच्या नावाखाली २ तास झोप काढता येणे, "को अहं?" ह्या प्रश्नाच सगळ्यात जास्त कॅन्फ्युसिंग उत्तर देणे, अध्यात्म ह्या विषयावर अगम्य इंग्रजी भाषेत शेक्स्पिअर ला मुस्काडात मारेल अशी वाक्य रचना करून अत्यंत क्लिष्ट मत मांडणे, म्हणून मला असा उगाचच वाटता कि पुण्यातले पेन्शनर हे ओरोविलिअन होण्यासाठी उत्कृष्ट उमेदवार आहेत.

आपण सदाशिव पेठेतले कोकणस्थ ब्राह्मण आहोत त्यामुळे आपल्यापेक्षा हि वरचढ कोणीतरी चेष्टेचा विषय होऊ शकत हे वाचून (आणि लिहून) बर वाटत...!

No comments:

Post a Comment