डोळ्यांनी मेंदूला फसवून भलतीकडे पहिलं,
मेंदुने मनाला फसवून भलतीच आठवण काढली,
मनाने मेंदूला फसवून भलताच भाव आणला,
भावनेने डोळ्यांना फसवून भलतेच अश्रू आणले !
अश्रूंनी गालांना फसवून भलतीच वाट धरली,
गालांनी ओठांना फसवून एकीकडे खळी आणली,
खळी ने डोळे झालं गेलं विसरून गेले,
डोळ्यांनी मेंदुला फसवून....... मिठी घट्ट केली !!
No comments:
Post a Comment